शिक्षकांच्या पगारवाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

By Admin | Updated: March 10, 2015 00:36 IST2015-03-10T00:36:24+5:302015-03-10T00:36:24+5:30

ठोक मानधनावरील शिक्षकांना वेतनवाढ देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत न आल्यामुळे राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेवकांनी ठिय्या

Nationalist Congress aggressor for the salary increase of teachers | शिक्षकांच्या पगारवाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

शिक्षकांच्या पगारवाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

नवी मुंबई : ठोक मानधनावरील शिक्षकांना वेतनवाढ देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत न आल्यामुळे राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेवकांनी ठिय्या करून प्रशासनाचा निषेध केला. ठराव आणल्यानंतरच कामकाज सुरू ठेवण्याची मागणी केल्यामुळे सभेचे कामकाज तहकूब केले .
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ठोक मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांनी गत आठवड्यात पालिका मुख्यालयासमोर उपोषण केले होते. या शिक्षकांना वेतनवाढ करण्यासाठीचा ठराव तत्काळ सर्वसाधारण सभेमध्ये आणण्यासाठीचा आदेश महापौर सागर नाईक यांनी प्रशासनास दिला होता. परंतु सोमवारी झालेल्या सभेमध्ये हा ठराव न आल्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जोपर्यंत ठराव येत नाही तोपर्यंत कामकाज सुरू करू नका अशी मागणी केली. शिक्षकांना प्रथम न्याय द्या असा आग्रह धरण्यात आला. अखेर महापौरांनी शिक्षकांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव मंगळवारी सभागृहात आणण्यात यावा अशा सूचना प्रशासनास दिल्या व सभा तहकूब केली.
राष्ट्रवादीच्या आक्रमकतेवर शिवसेनेच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आतापर्यंत पगार वाढविण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. अपयश झाकण्यासाठी आता आंदोलन करून दिखावा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका केली. (प्रतिनिधी)

Web Title: Nationalist Congress aggressor for the salary increase of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.