महाराष्ट्रातील सहा प्रकल्पांना राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 05:29 AM2019-07-19T05:29:40+5:302019-07-19T05:29:44+5:30

केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील तीन जिल्हयातील ६ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.

National Wildlife Sanction Approval for six projects in Maharashtra | महाराष्ट्रातील सहा प्रकल्पांना राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी

महाराष्ट्रातील सहा प्रकल्पांना राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी

Next

मुंबई : केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील तीन जिल्हयातील ६ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.
सोनवडे-घोडगे हा कोल्हापूर व सिंधुदुर्ग या जिल्हयांना जोडणाऱ्या घाट रस्त्याला दुसºया टप्प्याची मंजुरी देण्यात आली. यासह मेळघाट भागातील चौराकुंड-खोपण-खोलमार रोड पासींगच्या कामासह करंजखेडा-हातरू-राजपूर-सेमाडोह या १६ कि.मी. रोड पासींगला मंजुरी देण्यात आली आहे. राजगड-पुगलर ट्रान्समीशन लाईन आणि निमगांव लघु पाटबंधाºयाच्या कामालाही बैठकीत मंजुरी देण्यात आली.

Web Title: National Wildlife Sanction Approval for six projects in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.