राष्ट्रीय समाजवादी पार्टी 100 जागा लढणार

By Admin | Updated: September 5, 2014 02:33 IST2014-09-05T02:33:25+5:302014-09-05T02:33:25+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाजवार्दी पार्टीने राज्यात 100 जागा लढवणार असल्याची घोषणा शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

National Socialist Party will contest 100 seats | राष्ट्रीय समाजवादी पार्टी 100 जागा लढणार

राष्ट्रीय समाजवादी पार्टी 100 जागा लढणार

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाजवार्दी पार्टीने राज्यात 100 जागा लढवणार असल्याची घोषणा शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यनाथ चतुव्रेदी यांनी पहिली यादीतील 19 उमेदवारांची नावे जाहीर केली.
राज्यातील बेरोजगारी, विजेचे भारनियमन, दलित आदिवासी, अल्पसंख्याक, शेतकरी, शेतमजूर, कामगार आदी प्रश्न निवडणुकीतील मुख्य मुद्दे असतील, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेश सोनावणो यांनी दिली. 
याआधी पक्षाने चार राज्यांत महापालिका निवडणूक लढवली असून, 9 नगरसेवक निवडून आणण्याची किमया पक्षाने केली आहे. त्यात गुजरातच्या जामनगरमधील निवडणुकीत 2 नगरसेवक निवडून आणल्याचे सोनावणो यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘ज्या ठिकाणी पक्षाचे उमेदवार उभे राहणार नाहीत, अशा ठिकाणी समविचारी पक्षांना पाठिंबा देण्यात येईल. जातीयवादी पक्षांनी सत्तेकडे वाटचाल केल्याने समाजवादाला धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)

 

Web Title: National Socialist Party will contest 100 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.