राष्ट्रीय पल्स मोहिमेची जय्यत तयारी
By Admin | Updated: January 14, 2015 22:58 IST2015-01-14T22:58:02+5:302015-01-14T22:58:02+5:30
जिल्ह्यात रविवार, १८ जानेवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे

राष्ट्रीय पल्स मोहिमेची जय्यत तयारी
अलिबाग : जिल्ह्यात रविवार, १८ जानेवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ३ लाख १६ हजार १०५ बालकांकरिता जिल्ह्यातील सर्व म्हणजे १५ तालुक्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचा जादा डोस देण्यात येणार आहे.
पाच वर्षांखालील बालकांना या दिवशी पोलिओची लस पाजून या कार्यक्र मात सहभागी व्हावे व सहकार्य करावे, असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे व रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी केले आहे.
या मोहिमेसाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे. यासाठी ग्रामीण भागातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रे, त्याचप्रमाणे शहरी भागात बुथ उभारण्यात येणार असून या बुथवर रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचा डोस देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागातील अपेक्षित लाभार्थी बालके २ लाख ६३ हजार ५४६ व शहरी भागातील अपेक्षित लाभार्थी बालके ५२ हजार ५५९असे एकूण ३लाख १६ हजार १०५असून त्याकरिता ग्रामीण भागात ३ हजार १६४ आणि शहरी भागात २४३ असे एकूण ३ हजार ४०७ बुथवर लसीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. (विशेष प्रतिनिधी)