राष्ट्रीय मिल मजदूर संघ म्हाडावर धडकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 02:52 IST2018-07-18T02:52:01+5:302018-07-18T02:52:05+5:30
गिरणी कामगारांना घरे देण्याबाबत म्हाडाकडून होत असलेल्या दिरंगाईविरोधात राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे २६ जुलैला म्हाडा कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

राष्ट्रीय मिल मजदूर संघ म्हाडावर धडकणार
मुंबई : गिरणी कामगारांना घरे देण्याबाबत म्हाडाकडून होत असलेल्या दिरंगाईविरोधात राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे २६ जुलैला म्हाडा कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
गिरणी कामगारांनी अनेक वर्षे लढा देऊन घराचा हक्क मिळवला. मात्र, म्हाडाच्या गलथान कारभारामुळे सोडतीत यशस्वी होऊनही कामगारांना घरे मिळण्यात अडचणी निर्माण झाल्याचा आरोप संघाने केला आहे.
पनवेल येथील एमएमआरडीएच्या ८ हजार घरांच्या सोडतीपूर्वी बॉम्बे डाइंग व श्रीनिवास मिल या गिरण्यांमधील घरांची सोडत काढावी, त्यामुळे कामगारांची द्विधा मनस्थिती संपेल व ज्यांना गिरणीच्या जागेवरील घर मिळेल ते त्या ठिकाणी जातील व ज्यांना मिळणार नाही ते पनवेल येथील सोडतीमध्ये जातील, असा दावा संघाने केला आहे.
२८ जून २०१२, ९ मे २०१६ व २ डिसेंबर २०१६ च्या सोडतीमध्ये घरे लागलेल्या कामगारांना दंड आकारून किमतीपेक्षा अधिक रक्कम भरण्याची सक्ती म्हाडा करत आहे, असाही आरोप राष्ट्रीय मिल मजदूर संघाने केला.