गिरगाव चौपाटीच्या लोकमान्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ राष्ट्रध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:06 IST2021-07-24T04:06:01+5:302021-07-24T04:06:01+5:30

मुंबई : कोरोनाची बंधने पाळत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जयंती समारंभ पार पडला. गिरगाव ...

National flag hoisting near the full-length statue of Lokmanya at Girgaum Chowpatty | गिरगाव चौपाटीच्या लोकमान्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ राष्ट्रध्वजारोहण

गिरगाव चौपाटीच्या लोकमान्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ राष्ट्रध्वजारोहण

मुंबई : कोरोनाची बंधने पाळत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जयंती समारंभ पार पडला. गिरगाव चौपाटीच्या लोकमान्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ राष्ट्रध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर सतीश भिडे यांच्या गायक गटातील शेखर मस्तकार यांनी लोकमान्य टिळकांवर स्वरचित दमदार पोवाडा गायला. उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. ध्वजारोहण महापालिकेचे विभागीय सुरक्षा अधिकारी सुशील बडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी स्थानिक पोलीस निरीक्षक प्रदीप खुडे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजा बीडकर यांनी राष्ट्रध्वजाला व लोकमान्य टिळकांना मानवंदना दिली. महानगरपालिकेतर्फे अहिरे, राहुल कोल्हे व त्यांचा कर्मचारी वर्ग या कार्यक्रमास उपस्थित होता. महापालिकेतर्फे फुलांची उत्तम सजावट व व्यवस्था करण्यात आली होती. स्वराज्यभूमी स्मारक समितीने नेहमीप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. समितीच्या सहसचिव उज्ज्वला मेहेंदळे, संतोष गाजूल, अविनाश जाधव, नितीन वाडकर, श्रीनिवास यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात भाग घेतला.

Web Title: National flag hoisting near the full-length statue of Lokmanya at Girgaum Chowpatty