Join us

डॉ. सौम्या स्वामिनाथन यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 07:55 IST

रोख रक्कम पाच लाख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटरचा २०२३ चा राष्ट्रीय पुरस्कार डॉ. सौम्या स्वामिनाथन यांना जाहीर झाला आहे. दरवर्षी राष्ट्रीय एकात्मता, संवैधानिक मूल्यांचे जतन, भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात योगदान देणाऱ्या क्षेत्रात भरीव आणि अग्रेसर कार्य करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला हा पुरस्कार देण्यात येतो. रोख रक्कम पाच लाख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

मंगळवार, १२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण केंद्रात आयोजित कार्यक्रमामध्ये सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात येईल. लक्षणीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविषयी प्राप्त झालेल्या शिफारशींचा विचार करून ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार निवड समितीने डॉ. स्वामिनाथन यांची पुरस्कारासाठी निवड केली.

 

टॅग्स :मुंबई