मराठी संस्कृतीला न्याय देणारा ‘नटी’

By Admin | Updated: September 17, 2014 22:17 IST2014-09-17T22:17:22+5:302014-09-17T22:17:22+5:30

प्रेमातील लव्हस्टोरी सोडून नव्या विषयांना हात आणि साथ घालणारे चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहेत.

'Nati' who gives justice to Marathi culture | मराठी संस्कृतीला न्याय देणारा ‘नटी’

मराठी संस्कृतीला न्याय देणारा ‘नटी’

मुंबई : प्रेमातील लव्हस्टोरी सोडून नव्या विषयांना हात आणि साथ घालणारे चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहेत. कुठे एकत्र कुटुंब पध्दती, कुठे नातेसंबंध, कुठे विशेष मुले, तर कुठे राजकारणापासून समाजकारणार्पयतचे अनेक विषय. यातच भर घातली आहे ती शुक्रवारी 19 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या नटी या चित्रपटाने. केवळ चित्रपटासाठी चित्रपट नव्हे तर मराठी संस्कृतीचा बाज राखून चित्रपटसृष्टीत येणा:या ग्रामीण भागातील तरुणाईला मार्गदर्शन करणारा असा अभ्यासू चित्रपट असल्याचा विश्वास यावेळी नटीच्या टीमने व्यक्त केला.
लवकरच प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाच्या विशेष टीमने लोकमतच्या नवी मुंबई कार्यालयाला  सदिच्छा भेट दिली. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणो, अभिनेत्री तेजा देवकर आणि दिग्दर्शक योगेश जाधव यांनी मराठी चित्रपटसृष्टी, नाटय़क्षेत्र, मालिका आणि मराठीतील बदलाबाबत सविस्तर चर्चा केली. मराठी चित्रपटसृष्टीने कला जगवली आणि रसिकप्रेक्षकही जगवले. प्रत्येक टप्प्यावर आलेला चित्रपट हा त्या- त्या वळणावरचे नावीन्य घेऊन आलेला आहे. चित्रपटसृष्टीत कधी विनोदप्रधान चित्रपटांचा मोसम होता तर कधी प्रेमकथांवरील चित्रपटच हिट ठरले. हॉरर चित्रपटांनीही रसिक भयभीत झाले. आजचा जमाना हा ऑफबीट अर्थात काहीतरी हटके देण्याचा जमाना आहे. अशावेळी स्त्रीप्रधान भूमिका असलेला नटी चित्रपट नक्कीच वेगळा ठरेल असा विश्वास दिग्दर्शक योगेश जाधव यांनी व्यक्त केला. निर्माते गिरीश भदाणो यांच्या पूर्ण सहकार्यानेच एवढा बिग बजेट चित्रपट आणण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे ते म्हणाले. 
गावातल्या सर्वसामान्य मुलींसारखी एक सुलक्षणा नावाची मुलगी. लहानपणी शाळेमध्ये नाटक, नृत्यातून तिला नटीच व्हायचे असे वाटू लागले. अशा या सामान्य सुलक्षणाचा नटी बनण्यार्पयत विलक्षण प्रवास. गावरान बोलणारी ही सुलक्षणा चित्रपटसृष्टीत आल्यावर रेशम होते. या सगळ्या लढाईत ती काय कमावते आणि काय गमावते याचा आकृतीबंध या चित्रपटात गवसतो. चित्रपटाचे वलय लागल्यावरही जमिनीवरच असलेली ही सुलक्षणा ग्रामीण संस्कृतीचा बाज कायम राखते हे वैशिष्टय़. 
आपल्या मादक सौंदर्याने एकेकाळी सर्वानाच घायाळ करणा:या किशोरी शहाणो यांचीही भूमिका चित्रपटात रसिकांना घायाळ करणारीच आहे. यावेळी चित्रपटातील नायिका सुलक्षणा (तेजा) यांनीच 6क् ते 7क् पोषाख पूर्ण सिनेमात परिधान केले असून अत्याधुनिक आणि तेवढेच महागडे असे 4क्क् हून अधिक फॅशनेबल ड्रेसेस या चित्रपटातून फॅशन जगतातील रसिकांना पहायला मिळणार आहेत. दहीहंडीसारखे चटकमटक गाणो, नटी या मुख्य टायटलवरील गीत आणि प्रेमगीत अशी एकूण तीन गीते या चित्रपटात असून आशा भोसलेंनी गायलेली मी नटी हे गीत पिक्चरची शान वाढवेल. इतर गीते आनंद शिंदे, नेहा राजपाल, जावेद अली यांनी गायलेली आहे. सुबोध भावे, अजिंक्य देव यांच्या प्रमुख भूमिकेसोबत किशोर कदम, नागेश भोसले, शशांक शेंडे, प्रिया बेर्डे, नेहा जोशी आदी कलाकारांच्या भूमिका चित्रपटात आहेत. 
 
तरुणाईला संदेश
प्रत्येकालाच फिल्मजगताबाबत आकर्षण रहात आले आहे आणि ते तसे ग्लॅमर या क्षेत्रलाही आहे. मात्र केवळ ग्लॅमर म्हणून न बघता एक संधी, ध्येय आणि त्यासाठीची धडपड कशी असावी? याचा संदेश हा चित्रपट देतो. यातून पॉङिाटीव्ह विचार दिसून येतात. 
चित्रपटसृष्टीत मुली सेफ
इतर क्षेत्रंपेक्षाही चित्रपट जगतात काम करण्यास मुली खूप सेफ असल्याचे किशोरी शहाणोंनी मान्य केले. येथे प्रत्येकजण आपली जबाबदारी समजून घेतो आणि एकमेकाला तेवढा वेळ आणि सहकार्य देतो त्यामुळेच हे घडते. 
 
अमराठी दिग्दर्शकही दाखल
एकेकाळी भालजी पेंढारकर, विश्रम बेडेकरसारख्या व्यक्तींनी या क्षेत्रला वर नेले. दादासाहेब फाळकेंनी ही सृष्टी उभी केली. हेच सूत्र आजच्या दिग्दर्शक, निर्मात्यांनी पुढे नेले आहे. आजकाल अमराठी निर्माते, दिग्दर्शक मराठीत येत असल्याचे जाधव यांनी सांगितले. 
पूरा पैसा वसूल
सगळ्या प्रतीकांना दाखविणारा आणि थोडा हटके असलेला हा चित्रपट संवाद, कथा आणि गीतांनी परिपूर्ण आणि पैसा वसूल चित्रपट आहे, तो बघाच अशी रसिकांना सादही या टीमने यावेळी 
घातली. 

 

Web Title: 'Nati' who gives justice to Marathi culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.