'क्लोन' क्रेडीट कार्डने नर्गिस फाखरीची ६ लाखांना फसवणूक
By Admin | Updated: August 17, 2016 14:45 IST2016-08-17T13:49:03+5:302016-08-17T14:45:46+5:30
अभिनेत्री, मॉडेल नर्गिस फाखरीच्या अपरोक्ष तिच्या क्रेडीट कार्डचा वापर करुन तिची ६ लाख रुपयांना फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

'क्लोन' क्रेडीट कार्डने नर्गिस फाखरीची ६ लाखांना फसवणूक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - अभिनेत्री, मॉडेल नर्गिस फाखरीच्या अपरोक्ष तिच्या क्रेडीट कार्डचा वापर करुन तिची ६ लाख रुपयांना फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नर्गिसला या फसवणूकीची माहिती मिळताच तिने बँकेशी संपर्क साधून कार्ड ब्लॉक केले आणि मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली.
नर्गिसच्या क्रेडीट कार्डचे क्लोनिंग करुन तिची फसवणूक करण्यात आली. ठगाने कार्डचे क्लोनिंग करुन अमेरिकेत सर्व व्यवहार करत एकूण ९०६२ डॉलर्स खर्च केले.
क्लोन कार्डावरुन कोणतीही वस्तू खरेदी झाली नाही फक्त पैसे काढण्यासाठी वापर झाला असे जुहू पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील घोसाळकर यांनी सांगितले. कार्डावरुन व्यवहार झाले तेव्हा नर्गिस मुंबईत होती. मोबाईल संदेशावरुन तिला या व्यवहाराची माहिती मिळाली.