Join us  

दाऊदने नाही मी त्याला फरफटत आणलं, राज ठाकरेंची व्यंगचित्रातून नरेंद्र मोदींवर टीका

By शिवराज यादव | Published: September 23, 2017 11:41 PM

राज ठाकरेंनी आपल्या फेसबुक पेजवर व्यंगचित्र शेअर केलं असून यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पंतप्रधान मोदींना फरफटत आणत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. 

ठळक मुद्देराज ठाकरेंनी फेसबूकवर एंट्री करताच आपल्या स्टाईलने सरकार आणि टीकाकारांना उत्तर देण्यास सुरुवात केली आहेराज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली आहेअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पंतप्रधान मोदींना ओढत आणत असल्याचं व्यंगचित्रात दाखवण्यात आलं आहेफेसबुक पेज लाँचच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी स्वतः दाऊदला भारतात यायचे असून तो केंद्र सरकारशी सेटलमेंट करत आहे असा दावा केला होता

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी फेसबूकवर एंट्री करताच आपल्या स्टाईलने सरकार आणि टीकाकारांना उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. यावेळी राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. पण ही टीका शाब्दिक नसून व्यंगचित्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे. राज ठाकरेंनी आपल्या फेसबुक पेजवर व्यंगचित्र शेअर केलं असून यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पंतप्रधान मोदींना फरफटत आणत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. दाऊद फरफटत  आणत असतानाही मोदी म्हणजेच केंद्र सरकार मात्र आपण फरफटत आणल्याचा दावा करत असल्याचं व्यंगचित्रातून दाखवण्यात आलं आहे. एक 'तर्क'चित्र काढत राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपा सरकारवर ताशेरे ओढले आहेत. 

फेसबुक पेज लाँचच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी स्वतः दाऊदला भारतात यायचे असून तो केंद्र सरकारशी सेटलमेंट करत आहे असा दावा केला होता. यावरच आधारित व्यंगचित्र राज ठाकरेंनी रेखाटलं असून दाऊद स्वत:हून भारतात येत आहे असं दाखवण्यात आलं आहे. व्यंगचित्रात दाऊद इब्राहिम मोदींना फरफटत आणताना दाखवण्यात आलं आहे. मात्र तरीही मोदी आणलं की नाही फरफटत असं सांगत सर्व श्रेय घेत असल्याची उपहासात्मक टीका करण्यात आली आहे. 

सार्वत्रिक निवडणूक जिंकण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवल्या जात असून त्यात दाऊद इब्राहिमला भारतात आणण्याची योजना केंद्रात सुरु आहे. स्वतः दाऊदला भारतात यायचे असून, तो विकलांग झाला आहे. त्यामुळेच सध्या तो केंद्र सरकारशी सेटलमेंट करत आहे. पण दाऊदला आणल्यानंतर कशाप्रकारे आपण त्याला आणलं याचं श्रेय भाजपा घेईल असं राज ठाकरे बोलले होते. 

राज ठाकरेंनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी सरकारच्या कारभारावर अत्यंत बोच-या शब्दात टीका केली होती. पण शिवसेनेवर टीका करण्याचे टाळले होते. भाजपाने केलेला सोशल मीडियाचा वापर, मुंबई मेट्रो, बुलेट ट्रेन यावर त्यांनी जोरदार टीका केली होती. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कोणासाठी करताय ? बुलेट ट्रेनने अहमदाबाद जाऊन ढोकळा खाण्यापेक्षा इथे चांगले ढोकळे मिळतात. 

गुजरात आणि मुंबईतल्या गुजराती माणसाच्या सोयीसाठी तुम्ही 1 लाख 10 हजार कोटींच कर्ज काढून बुलेट ट्रेन बनवताय अशी टीका त्यांनी केली होती. मुंबईतून मेट्रो ट्रेन जिथून जाणारे आहे तिथले जागांचे भाव प्रचंड वाढले आहेत. या ठिकाणी घर विकत घेणे कठिण बनले आहे. मेट्रोचा आराखडाही मराठी माणसाचे महत्व कमी करण्याच्या हेतूने आखण्यात आला आहे. विकास कामांच्या नावाखाली अन्य भाषिकांचे मतदारसंघ तयार करण्याचे काम सुरु आहे असे राज ठाकरे यांनी सांगितले होते. 

शिवाजी पार्कमध्ये मोबाईलवर पुल देशपांडे ऐकणारा मराठी मातीशी एकरुप झालेला गुजराती माझा आहे. बुलेट ट्रेन, मेट्रोच्या आडून मराठी माणसाला नख लावायचा प्रयत्न झाला तर, धिंगाणा घालू असा इशाराच राज यांनी दिला होता. नरेंद्र मोदींचे 48 टक्के तर, राहुल गांधींचे 54 टक्के फॉलोअर्स  फेक खोटे असल्याचा आरोप राज यांनी केला होता.  

टॅग्स :राज ठाकरेनरेंद्र मोदीसोशल मीडिया