नरेंद्र मोदींवर टीका केली नाही - राज ठाकरे

By Admin | Updated: July 13, 2014 19:37 IST2014-07-13T19:34:26+5:302014-07-13T19:37:35+5:30

मनविसेच्या मेळाव्यातील भाषणात आपण नरेंद्र मोदींवर नव्हे तर सोशल मीडियावर टीका केली होती, असे घूमजाव मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केले आहे.

Narendra Modi did not criticize - Raj Thackeray | नरेंद्र मोदींवर टीका केली नाही - राज ठाकरे

नरेंद्र मोदींवर टीका केली नाही - राज ठाकरे

>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १३ - महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात आपण नरेंद्र मोदींवर टीका केलेली नाही, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. या मेळाव्यात आपण सोशल मीडियावर बोललो होतो, असेही त्यांनी सांगितले. मनविसेच्या मेळाव्यातील भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी मोदींची हवा आता विरली आहे असे वक्तव्य केले होते. त्यावर चहुबाजूंनी टीका सुरू झाल्यावर राज यांनी घूमजाव करत आपण मोदींबाबत नव्हे तर सोशल मीडियाबाबत बोललो असे सांगितले. तसेच मला कोणावर टीका करायची असेल तर ती मी खुलेआम करेन असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे शुक्रवारी माटुंगा येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच टीकेचे लक्ष्य केले. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना सोशल मिडीयाने उचलून धरले. आता तीच सोशल मिडीया मोदींविरोधात लिहीत आहे. त्यामुळे सोशल मिडीयापासून चार हात लांबच राहा, असा सल्ला त्यांनी युवा कार्यकर्त्यांना दिला होता. 
 
 
 

Web Title: Narendra Modi did not criticize - Raj Thackeray