नाना पटोले १२ फेब्रुवारीला पदभार स्वीकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:06 IST2021-02-08T04:06:07+5:302021-02-08T04:06:07+5:30

मुंबई : प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह नवनियुक्त कार्याध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे शुक्रवार, दि. १२ फेब्रुवारीला ऐतिहासिक ...

Nana Patole will assume office on February 12 | नाना पटोले १२ फेब्रुवारीला पदभार स्वीकारणार

नाना पटोले १२ फेब्रुवारीला पदभार स्वीकारणार

मुंबई : प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह नवनियुक्त कार्याध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे शुक्रवार, दि. १२ फेब्रुवारीला ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान येथे आयोजित कार्यक्रमात पदभार स्वीकारणार आहेत, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दिली आहे.

महात्मा गांधी यांनी १९४२ साली मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातून इंग्रजांना ‘चले जाव’ म्हणत स्वातंत्र्यांच्या निर्णायक लढ्याची सुरुवात केली होती. त्याच ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. यावेळी महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नाना पटोले यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवतील. या कार्यक्रमाला राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, राज्य मंत्रिमंडळातील काँग्रेसचे मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, बी. एम. संदीप, वामशी रेड्डी, संपत कुमार, सोनल पटेल, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Nana Patole will assume office on February 12