Join us  

नाना पाटेकर यांना ‘क्लीन चिट’; पोलिसांकडे पुरावेच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 3:06 AM

तनुश्री छेडछाड प्रकरण

मुंबई : अभिनेते नाना पाटेकर यांच्या विरोधात तनुश्री दत्ता या अभिनेत्रीने केलेल्या लैंगिकछळाच्या आरोप प्रकरणात काही पुरावेच मिळत नसल्याची कबुली ओशिवरा पोलिसांनी न्यायालयात दिली. त्यामुळे नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर अभिनेते नाना पाटेकर यांनी आपला लैंगिकछळ केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने ‘मी टू’ या चळवळीअंतर्गत केला होता. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात पाटेकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी बुधवारी अंधेरी न्यायालयात ओशिवरा पोलिसांनी ‘बी समरी’ अहवाल सादर केला. तनुश्रीने नाना यांच्याविरोधात जे आरोप केले आहेत, ते सिद्ध करणारे कोणतेही ठोस पुरावे त्यांना सापडलेले नाहीत. त्यामुळे तनुश्रीने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. संशयित आरोपीविरोधात कोणताच पुरावा सापडला नाही की पोलीस ‘बी समरी’ रिपोर्ट न्यायालयात सादर करतात. तनुश्री दत्ताचे वकील नितीन सातपुते यांनी मात्र या प्रकरणी पोलिसांच्या तपासावर अविश्वास दर्शवला आणि उच्च न्यायालयाचे दरवाजे आपण ठोठावणार असल्याचे सांगितले.घाई काय होती?भ्रष्ट पोलीस अधिकारी आणि सिस्टममुळे नाना पाटेकर यांना ‘क्लीन चिट’ मिळाली. जबाब पूर्णपणे न नोंदविता पोलिसांनी ‘बी समरी’ फाईल करण्याची घाई करण्याचे कारण काय होते?-तनुश्री दत्ता, अभिनेत्री

 

टॅग्स :तनुश्री दत्तानाना पाटेकरमीटू