विलेपार्लेच्या मनपा दवाखान्याला मनोहर पर्रिकरांचे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:06 IST2021-03-19T04:06:30+5:302021-03-19T04:06:30+5:30

मुंबई : विलेपार्ले येथील मनपा दवाखान्याला माजी केंद्रीय संरक्षण मंत्री स्वर्गीय मनोहर पर्रिकरांचे नाव देण्यात आले. स्व. मनोहर ...

Name of Manohar Parrikar to Vile Parle Municipal Hospital | विलेपार्लेच्या मनपा दवाखान्याला मनोहर पर्रिकरांचे नाव

विलेपार्लेच्या मनपा दवाखान्याला मनोहर पर्रिकरांचे नाव

मुंबई : विलेपार्ले येथील मनपा दवाखान्याला माजी केंद्रीय संरक्षण मंत्री स्वर्गीय मनोहर पर्रिकरांचे नाव

देण्यात आले. स्व. मनोहर पर्रिकरांच्या द्वितीय स्मरण दिनाचे औचित्य साधून कोलडोंगरी विलेपार्ले येथील मनपा दवाखान्याचे मनोहर पर्रिकर आरोग्य केंद्र व आयुर्वेदिक दवाखाना असे नामकरण आमदार ॲड. पराग अळवणी यांच्या हस्ते करण्यात आले. विलेपार्ले पूर्व कोलडोंगरी येथे सध्या असलेल्या बैठ्या दवाखान्याचे विस्तारीकरण करण्याचा प्रस्ताव नगरसेवक अभिजीत सामंत यांनी मांडून त्याचा पाठपुरवठा केला. येत्या वर्षात या कामाचा शुभारंभ होईल.

या विस्तारीकरणाद्वारे या बैठ्या दवाखान्याच्या जागी ५ मजली इमारत बांधली जाईल. यामध्ये पहिले २ मजले आयुर्वेदिक दवाखाना ३ व ४ मजला डायलिसिस सेन्टर, ५व्या मजल्यावर योगा, ॲक्युप्रेशर थेरेपीकरिता केंद्र अशा सुविधा निर्माण केल्या जातील, अशी माहिती नगरसेवक सामंत यांनी दिली.

Web Title: Name of Manohar Parrikar to Vile Parle Municipal Hospital