Join us

पूर्व मुक्त मार्गास विलासराव देशमुख यांचे नाव द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 12:56 IST

Eastern Freeway : देशमुख यांनी पुर्व मुक्त मार्गाची संकल्पना मांडली होती.

मुंबई  : मुंबईची वाहतुक कोंडी लक्षात घेत महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जोडणाऱ्या पुर्व मुक्त मार्गाची संकल्पना मांडली होती. त्यांच्या मुळेच हा मार्ग तयार होऊ शकला. त्यामुळे पूर्व मुक्त मार्गास  माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी राज्याचे मत्स्यव्यवसाय, वस्त्रोद्योग, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री  अस्लम शेख यांनी एका पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

या रस्त्याची लांबी १६.८ कि.मी. असून दक्षिण मुंबईतील पी डीमोलो रोड पासुन ते चेंबूर येथील पूर्व द्रुतगती मार्गास हा मार्ग जोडला जातो. सध्या हा रस्ता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. या रस्त्यास माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं नाव देणं ही त्यांच्या कार्याची पोहच पावती असेल असंही त्यांनी पत्राच्या शेवटी नमूद केले आहे. 

टॅग्स :रस्ते वाहतूकरस्ते सुरक्षामुंबईमहाराष्ट्र