नालेसफाई वेळेत करा
By Admin | Updated: May 7, 2015 04:40 IST2015-05-07T04:40:17+5:302015-05-07T04:40:17+5:30
पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून महापालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आढावा आयुक्त अजय मेहता यांनी बुधवारी घेतला.

नालेसफाई वेळेत करा
>मुंबई : पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून महापालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आढावा आयुक्त अजय मेहता यांनी बुधवारी घेतला. नेहरू सायन्स सेंटर व महालक्ष्मी जंक्शन येथील नाल्यातील गाळ काढण्याच्या कामाच्या पाहणीसह रेसकोर्स नाल्यातील गाळ काढण्याच्या कामाचीही पाहणी करत ही मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले.
वरळी लव्हग्रोव्ह उदंचन केंद्र येथील पर्जन्य उदंचन केंद्राचे काम अंतिम टप्प्यात असून कामाची पाहणी केल्यानंतर त्यांनी पर्जन्य उदंचन केंद्र मेअखेर सुरू करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश दिले. हे उदंचन केंद्र कार्यान्वित झाल्यास मौलाना आझाद रोड, जमशेटजी जीजीभॉय रोड, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, केशवराव खाडय़े मार्ग, डॉ. दादासाहेब भडकमकर रोड, परशुराम पुप्पाला रोड, आर.एस. निमकर मार्ग, डॉ. आनंदराव नायर रोड, एन.एम. जोशी मार्ग बी.डी.डी. चाळी, डॉ. ई. मोङोस रोड, साने गुरुजी मार्ग, पठ्ठे बापुराव मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. अॅनी बेझंट रोड येथील पाण्याचा निचरा होईल.
‘एफ/दक्षिण’ विभागासमोरील मडकेबुवा चौक येथे पर्जन्य जलवाहिन्या टाकण्याच्या कामात खडकांमुळे अडचण येत आहे, तरीही हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून रस्ता समतोल करावा, असे आदेश त्यांनी दिले. शिवडी, रेती बंदर येथील ब्रिटानिया पर्जन्य उदंचन केंद्राचे काम सुरू असून येत्या डिसेंबर अखेर्पयत पूर्ण होईल आणि पावसाळ्यात उदंचन केंद्राच्या परिसरात येणा:या विभागातील पाण्याचा निचरा त्वरित होणार आहे. (प्रतिनिधी)
> क्लिव्हलँड बंदर येथे सुरू असलेल्या व पूर्णत्वास आलेल्या पर्जन्य उदंचन केंद्राची पाहणी करण्यात आली.
> क्लिव्हलँड बंदर पर्जन्य उदंचन केंद्र कार्यान्वित झाल्यास दादर मार्केट, दादर रेल्वे स्थानक, भवानी शंकर रोड, म्हात्रे पेन वर्क्स, दादर सिवरेज ऑपरेशन्स सेंटर, फितवाला लेन, सनमिल लेन, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन रोड, ड्रेनेज चॅनेल रोड, एन.एम. जोशी मार्ग, शंकरराव नरम मार्ग, शिवराम अमृतवार मार्ग, दादासाहेब फाळके मार्ग, सेनापती बापट मार्ग (दक्षिण) या विभागांतील पाण्याचा निचरा होईल.