नालेसफाई ‘केरात’
By Admin | Updated: May 20, 2015 00:42 IST2015-05-20T00:42:51+5:302015-05-20T00:42:51+5:30
महापालिकेने मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाचा धडाका लावला आहे. त्यासाठी ३१ मेची डेडलाइन देण्यात आली आहे.

नालेसफाई ‘केरात’
नवी मुंबई : महापालिकेने मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाचा धडाका लावला आहे. त्यासाठी ३१ मेची डेडलाइन देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे हे स्वत: या कामावर नजर ठेवून आहेत. मात्र महापालिकेची ही मेहनत केरात गेली आहे. नालेसफाईच्या कामाला वाकुल्या दाखवत एपीएमसीने मार्केटमधील कचरा चक्क शेजारच्या
मोठ्या नाल्यात टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस
आला आहे.
शहरात ७४ किलोमीटर लांबीचा नैसर्गिक नाला आणि ५६३ किमी लांबीची पावसाळी गटारे आहेत. पावसाळ्यापूर्वी ही गटारे आणि नाल्यातील गाळ उपसण्यासासाठी महापालिकेने विभागनिहाय ठेकेदारांच्या नेमणुका केल्या आहेत. त्यानुसार १ मेपासून शहराच्या विविध भागांत एकाच वेळी नाले व गटारांच्या साफसफाईला सुरुवात करण्यात आली आहे. ही कामे नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत, या दृष्टीने प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी महापौर सुधाकर सोनावणे आणि महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी शहरात दौरा काढून या कामांची पाहणी केली.
या दरम्यान त्यांनी मोठे नाले, होल्डिंग पॉण्ड आदी ठिकाणांना भेटी देवून पाहणी केली. मात्र
शहरातील अनेक घटकांकडून महापालिकेच्या या कामात प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष
खो घालण्याचे प्रयत्न होताना दिसत आहे. काही भागांत नाल्यातील गाळ उपसल्यानंतर काही तासांतच त्यात पुन्हा डेब्रिज व कचरा टाकल्याचे दिसून आले आहे.
विशेष म्हणजे कृषी मालाची आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एपीएमसी प्रशासनानेसुद्धा मनपाच्या नालेसफाईची उघड-उघड खिल्ली उडविल्याचे दिसून आले आहे. (प्रतिनिधी)
च्एपीएमसीच्या तुर्भे येथील पाच बाजारपेठांत रोज मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. हा दैनंदिन कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी एपीएमसीची स्वतंत्र यंत्रणा आहे. असे असतानाही तुर्भेकडून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या मोठ्या नाल्यात मार्केटमधून तयार झालेल्या कचऱ्याचा खच पडल्याचे दिसते.
च्या पार्श्वभूमीवर महापालिकेने कठोर भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
नाल्यात डम्पिंग
च्फळ आणि मसाला मार्केटमधील कचऱ्याच्या डम्पिंगसाठी हा नाला वापरला जाऊ लागला आहे.
च्मसाला मार्केटमधील सफाई कर्मचाऱ्यांनी सोमवारी या
नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा डम्प केला आहे.
च्त्यामुळे नाल्यातील सांडपाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होत आहे.