नालासोपारा छोट्या बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:09 IST2021-01-16T04:09:16+5:302021-01-16T04:09:16+5:30

नालासाेपारा : वसई कोळीवाडा येथील किल्लाबंदरमध्ये राहणाऱ्या १५ वर्षांच्या मुलीचे बुधवारी रात्री अपहरण करण्यात आले. मुलीच्या आईने वसई पोलीस ...

Nalasopara short news | नालासोपारा छोट्या बातम्या

नालासोपारा छोट्या बातम्या

नालासाेपारा : वसई कोळीवाडा येथील किल्लाबंदरमध्ये राहणाऱ्या १५ वर्षांच्या मुलीचे बुधवारी रात्री अपहरण करण्यात आले. मुलीच्या आईने वसई पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार देऊन अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

भाजीविक्रेत्यांमध्ये बाचाबाची

नालासोपारा : पश्चिमेतील ओव्हरब्रिजच्या खाली रवींद्र रुपनवर (३२) हे भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. शेजारीच भाजीविक्री करणाऱ्या लक्ष्मण पठारे यांनी बुधवारी सकाळी भाजी घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाला इशारा करून बोलावले. त्यावरून झालेल्या वादातून आरोपी लक्ष्मण, विशाल आणि चांगोना यांनी रवींद्रला मारहाण केली. नालासोपारा पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे.

वसई-विरारमध्ये ३३ रुग्ण

वसई : वसई-विरार शहर महापालिका हद्दीत शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे ३३ रुग्ण नव्याने आढळून आले असून, २८ रुग्ण विविध रुग्णालयांतून मुक्त झाले आहेत. शहरात दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. शहरांत अजूनही १९८ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नालासोपारा : शहरातील १० वर्षांच्या मुलीवर ३८ वर्षीय आरोपीने २ नोव्हेंबर २०१६ ते २० नोव्हेंबर २०२० यादरम्यान अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. याबाबत कोणाला काही सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी त्याने पीडित मुलीला दिली हाेती. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी गुरुवारी पोक्सोअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

Web Title: Nalasopara short news