नालासोपारा गोळीबार; एक ताब्यात

By Admin | Updated: May 10, 2017 03:16 IST2017-05-10T03:15:41+5:302017-05-10T03:16:30+5:30

पुजारी टोळीच्या गुंडांनी नालासोपारातील गॅलेक्सी हॉटेलच्या व्यवस्थापकावर गोळीबार केल्याची घटना भरिदवसा घडल्याने

Nalasopara firing; Possess a possession | नालासोपारा गोळीबार; एक ताब्यात

नालासोपारा गोळीबार; एक ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
विरार : पुजारी टोळीच्या गुंडांनी नालासोपारातील गॅलेक्सी हॉटेलच्या व्यवस्थापकावर गोळीबार केल्याची घटना भरिदवसा घडल्याने पोलीस अधीक्षकांनी तपासासाठी पाच पोलीस पथके नियुक्त केली आहे. या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
नालासोपारा पश्चिमेकडील एसटी डेपो रोडवर असलेल गॅलेक्सी हॉटेलमध्ये व्यवस्थापक दिलीपकुमार कॅश काऊंटरवर बसले होते. दुपारी चेहऱ्यावर रुमाल बांधलेला एक तरुण त्यांच्या काऊंटरजवळ आला. ‘तुम्हारा शेठ किधर है’ अशी त्याने विचारणा केली आणि रिव्हॉल्वर काढून त्याच्यावर एक गोळी झाडली.

Web Title: Nalasopara firing; Possess a possession