उल्हासनगरात नालेसफाई संथगतीने

By Admin | Updated: May 22, 2014 04:17 IST2014-05-22T04:17:16+5:302014-05-22T04:17:16+5:30

शहरातील नालेसफाईबाबत उपमहापौर जमनुदास पुरस्वानी यांनी नाराजी व्यक्त केली असून यासाठी जादा यंत्रसामग्रीची गरज असल्याची माहिती त्यांनी दिली.

Nalasefai briefly in Ulhasnagar | उल्हासनगरात नालेसफाई संथगतीने

उल्हासनगरात नालेसफाई संथगतीने

उल्हासनगर : शहरातील नालेसफाईबाबत उपमहापौर जमनुदास पुरस्वानी यांनी नाराजी व्यक्त केली असून यासाठी जादा यंत्रसामग्रीची गरज असल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या दहा दिवसांत लहान नाल्याची सफाई झाली नाही तर ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी आयुक्तांकडे केल्या आहेत. उपमहापौरांनी स्थायी समिती सभापती जयश्री चौधरी यांच्यासमवेत नालेसफाईची पाहणी केल्यानंतर घेतलेल्या आढाव्यानंतर ही माहिती दिली. महापालिकेने लहान नाल्याच्या सफाईचा ठेका प्रभाग समितीनिहाय मजुर संस्थेला दिला आहे. नालेसफाईसाठी कामगारही मिळत नसल्याची बाब उघड झाली आहे. कामगारांअभावी लहान नाल्याची सफाई रखडल्याचा आरोप उपमहापौरांनीच केला आहे. शहरातील ४६ मोठया नाल्याची सफाईचा ठेका शुभम कंपनीला देण्यात आला आहे. सफाई ठेक्याला स्थायी समितीत मंजूरी मिळण्यापूर्वीच ठेकेदाराने नाले सफाईला सुरुवात केली आहे. वालधुनी नदी, खेमाणी नाला, फर्निचर मार्केटचा नाला, मयुर हॉटेल जवळचा नाला आदी नाल्यांची पाहणी त्यांनी केली़ मोठया नाल्यांची १० टक्केही सफाई झाली नसून साफसफाईचा वेग असाच राहिल्यास पावसाळयात पुराचे पाणी तुंबून जीवित व वित्तहानी होण्याची भिती चौधरी यांनी व्यक्त केली आहे. नालेसफाई गांभीर्याने न केल्यास पालिका प्रशासनाला जबाबदार धरण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Nalasefai briefly in Ulhasnagar