मुंबई : भांडुप पश्चिम येथील महाराष्ट्रनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या दरबारात १६ सप्टेंबर रोजी ‘माझा मोदक’ स्पर्धा रंगली. लोकमत सखी मंच आणि माझा यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा रंगली असून परिसरातील सखींनी उदंड प्रतिसाद दिला. यंदा या मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून गेली अनेक वर्षे हे मंडळ सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कार्य करीत आहे.१९६१ पासून या मंडळातर्फे दरवर्षी सामाजिक तसेच करमणुकीचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. दरवर्षी या बाप्पाच्या मंडपात मोठे प्रवेशद्वार, सजावट आणि देखरेख केली जाते. त्याचप्रमाणे, सामाजिक भान राखून आरोग्य शिबिर, रक्तदान, ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा, शालेय विद्यार्थ्यांना वस्तूंचे वाटप करण्यात येते. त्याचप्रमाणे, शाळेच्या फीसाठी विद्यार्थ्यांना मदत केली जाते. या मंडपात पार पडलेल्या ‘माझा मोदक’ स्पर्धेत प्रथम क्रमांक विनया सावंत यांनी पटकाविला. तर द्वितीय स्थानी अमृता आॅस्टीन, तृतीय स्थानी गायत्री सावंत विजेत्या ठरल्या. तर उत्तेजनार्थ म्हणून स्वप्नाली जाधव, वंदना खणकर आणि मेघा पांचाळ यांना मिळाले आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा तेथे पार पडला. या स्पर्धेचे परीक्षण शेफ आरती निजापकर यांनी केले.
महाराष्ट्रनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या दरबारात रंगली ‘माझा मोदक’ स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 02:40 IST