माय-लेकीचा व्हिडीओ काढणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 05:41 IST2019-03-04T05:41:42+5:302019-03-04T05:41:46+5:30
मुलीसोबत निघालेल्या महिलेचा पाठलाग करत, त्यांचे छायाचित्रण केल्याची घटना एमआरए मार्ग परिसरात शनिवारी घडली.

माय-लेकीचा व्हिडीओ काढणाऱ्यास अटक
मुंबई : मुलीसोबत निघालेल्या महिलेचा पाठलाग करत, त्यांचे छायाचित्रण केल्याची घटना एमआरए मार्ग परिसरात शनिवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी मोहद्दीन इस्लाम अकबर (२२) याला विनयभंगाच्या गुन्ह्यांत अटक केली.
तक्रारदार महिला शनिवारी सायंकाळी मुलीसोबत डी. एन. रोडने जात होती, तेव्हा एक तरुण त्यांचा पाठलाग करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला हटकले, आणि त्याच्या मोबाइल हिसकावला, तेव्हा तो मोबाइलमध्ये दोघींची व्हिडीओ काढत असल्याचे दिसून आले. स्थानिकांच्या मदतीने त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.