‘माझी मुलगी आत्महत्या करू शकत नाही’

By Admin | Updated: June 21, 2017 02:54 IST2017-06-21T02:54:20+5:302017-06-21T02:54:20+5:30

भोजपुरी अभिनेत्री व मॉडेल अंजली श्रीवास्तव (२९) हिने आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांनी आपल्या प्राथमिक अहवालात केली असली

'My daughter could not commit suicide' | ‘माझी मुलगी आत्महत्या करू शकत नाही’

‘माझी मुलगी आत्महत्या करू शकत नाही’

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भोजपुरी अभिनेत्री व मॉडेल अंजली श्रीवास्तव (२९) हिने आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांनी आपल्या प्राथमिक अहवालात केली असली, तरी तिच्या पालकांनी मात्र त्याबाबत आक्षेप घेतला आहे. ती दृढनिश्चयी व धैर्यवान होती त्यामुळे ती आत्महत्या करूच शकत नाही, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य बाहेर काढावे, अशी मागणी अंजलीची आई शीला श्रीवास्तव यांनी केली आहे. अंधेरी (प.) येथील परिमल सोसायटीत पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहत असलेली अंजली सोमवारी मृतावस्थेत आढळून आली होती.

Web Title: 'My daughter could not commit suicide'