गुुजराती चित्रपटास मनसेचा आक्षेप
By Admin | Updated: September 30, 2015 00:50 IST2015-09-30T00:50:41+5:302015-09-30T00:50:41+5:30
शांतीवन येथील गोयल शॉपिंग सेंटरमधील सोना चित्रपटगृहात प्राइम टाइममध्ये गुजराती चित्रपटाचा शो दाखवण्यास मनसेच्या महिला प्रदेश सचिव सिद्धिता मोरे

गुुजराती चित्रपटास मनसेचा आक्षेप
मनोहर कुंभेजकर, मुंबई
शांतीवन येथील गोयल शॉपिंग सेंटरमधील सोना चित्रपटगृहात प्राइम टाइममध्ये गुजराती चित्रपटाचा शो दाखवण्यास मनसेच्या महिला प्रदेश सचिव सिद्धिता मोरे आणि मागठाणे विधानसभेच्या स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.
हा अन्याय सहन करणार नाही. या चित्रपटगृहात लवकरात लवकर प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखविण्यात यावेत; अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. मनसेच्या शिष्टमंडळात मनसे उपाध्यक्ष अवधूत चव्हाण, प्रभाग क्रमांक १० चे शाखाध्यक्ष राजेश कासार, मंगेश जोग, महिला शाखाध्यक्ष दर्शना खरे, श्रद्धा वैद्य यांचा समावेश होता.