मस्ट...भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार द्यावा -आदित्य ठाकरे
By Admin | Updated: October 11, 2014 23:33 IST2014-10-11T23:33:30+5:302014-10-11T23:33:30+5:30
मस्ट...सुपरवोट...फोटोसह....फोटो मेलवर आहेत....

मस्ट...भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार द्यावा -आदित्य ठाकरे
म ्ट...सुपरवोट...फोटोसह....फोटो मेलवर आहेत......................................................................................... भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार द्यावा -आदित्य ठाकरे मुंबई: शिवसेनेचे चांदिवलीतील उमेदवार संतोष सिंह यांनी चांदिवली मतदारसंघात काढलेल्या रॅलीत युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे तरु णाई आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला होता. हिंमत असेल भाजपने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करावा, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले. प्रचारादरम्यान चांदिवली म्हाडा कॉलनी ते संघर्ष नगर दरम्यान बाईक रॅली काढण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र रिक्षा चालक सेना असल्फा युनिटही रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीत विभागप्रमुख भाऊ कोरगावकर, शाखाप्रमुख सागर तुळसकर, विष्णु शिंदे, माजी नगरसेवक चित्रा सांगळे, राजेश चिंदरकर, नगरसेविका कोमल जामसांडेकर, हरिश शुक्ला, लीना शुक्ला, राजेश भारती आणि युवासेना पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)