नवीन थांब्यांसाठी ‘मरे’ला भरुदड
By Admin | Updated: October 30, 2014 02:00 IST2014-10-30T02:00:22+5:302014-10-30T02:00:22+5:30
लोकल आणि मेल-एक्सप्रेस गाडय़ांना मागणीनुसार स्थानकांवर थांबा देण्यात येतो. असे आणखी नवे थांबे मध्य रेल्वेवरील गाडय़ांना द्यायचे असल्यास साधारण 58 कोटी रुपयांचा भरुदड पडणार आहे.

नवीन थांब्यांसाठी ‘मरे’ला भरुदड
मुंबई : लोकल आणि मेल-एक्सप्रेस गाडय़ांना मागणीनुसार स्थानकांवर थांबा देण्यात येतो. असे आणखी नवे थांबे मध्य रेल्वेवरील गाडय़ांना द्यायचे असल्यास साधारण 58 कोटी रुपयांचा भरुदड पडणार आहे. मात्र हे थांबे मागणीनुसार द्यावेच लागणार असून, त्यासाठी तरतूद करण्यात येत आहे.
मध्य रेल्वेवर भविष्यात अनेक नवे प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहेत. अशा जवळपास 397 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा समावेश असून, ते मंजुरीसाठी नुकतेच रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई विभागात असणारे लाइन क्रॉस गेट बंद करून त्याऐवजी रोड ओव्हर ब्रिज बांधण्यात येणार आहेत. त्या कामासाठी 52 कोटी 87 लाख रुपयांचा खर्च, सिग्नल आणि दूरसंचार, पुलांचे नूतनीकरण आणि रेल्वेच्या अखत्यारीत येणा:या रस्ते सुरक्षा कामांसाठीही 130 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. अशा अनेक कामांचा यात समावेश असून नवीन थांबा देण्याबरोबरच अतिरिक्त डबा जोडणीही केली जाणार आहे. यासाठी तब्बल 58 कोटी रुपयांचा खर्च मध्य रेल्वेला येणार आहे.
नवीन थांबे दिल्यास त्याचा फायदा प्रवाशांना नक्की मिळेल. मात्र यात रेल्वेला नुकसानच सोसावे लागणार असल्याचे सांगितले जाते. नवीन थांब्याचा फायदा जवळपास 400 ते 500 गाडय़ांना मिळणार असून, यातील प्रत्येक ट्रेनला दोन मिनिटे अतिरिक्त थांबा मिळणार आहे.
हे पाहता मध्य रेल्वेला खर्चिक
ठरणार असल्याचे रेल्वेतील
एका वरिष्ठ अधिका:याने
सांगितले. (प्रतिनिधी)
नुकत्याच झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात नवीन थांबा गरज असेल त्या स्थानकातच दिला जाईल, असे सांगतानाच काही स्थानकांवर प्रवासी नसलेल्या ठिकाणीही थांबा देण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले होते. अशा स्थानकांवरील थांबे पाहणीनंतर बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेला एक प्रकारे हा भरुदडच असल्याचे सांगण्यात येते.