खून करणारे १० दिवसांत अटकेत

By Admin | Updated: February 15, 2015 00:49 IST2015-02-15T00:49:59+5:302015-02-15T00:49:59+5:30

नोकरीचे आमिष दाखवून पैसे घेऊन नोकरी न लावल्याचा राग मनात धरून विलास सावंत याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर, त्याला बेदम मारहाण करण्यात आली.

The murderer detained in 10 days | खून करणारे १० दिवसांत अटकेत

खून करणारे १० दिवसांत अटकेत

ठाणे : नोकरीचे आमिष दाखवून पैसे घेऊन नोकरी न लावल्याचा राग मनात धरून विलास सावंत याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर, त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा मृत्यू झाला. मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या तिघांना ठाणे खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. कोणतेही धागेदोरे नसताना हा गुन्हा अवघ्या १० दिवसांत उघडकीस आणण्यात अला.
कोलशेत खाडीजवळ ४ फेब्रुवारीला एक व्यक्ती जखमी व नग्नावस्थेत आढळली. त्याला रुग्णालयात नेले असता मृत्यू झाला. एन. टी. कदम यांच्या पथकाने बाबू पठाडे, अशोक घुले आणि संतोष गिरी या त्रिकुटाला अटक केली. त्यांची चौकशी केली असता मयत विलास याने आनंद परब असे नाव सांगून नोकरी लावतो या बहाण्याने ६ हजार रुपये घेतले होते. नोकरी मात्र लावण्यात आली नव्हती. त्यामुळे त्याचे अपहरण करून त्याला बांबूने मारहाण केल्याची त्यांनी कबुली दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The murderer detained in 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.