वॉर्डबॉयकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By Admin | Updated: December 4, 2014 01:35 IST2014-12-04T01:35:41+5:302014-12-04T01:35:41+5:30

उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या अल्पवयीन मुलीचा रुग्णालयातीलच वॉर्डबॉयने विनयभंग केल्याची घटना आज विक्रोळी येथे घडली

Murdered of Wardoboy by a minor girl | वॉर्डबॉयकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

वॉर्डबॉयकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

विक्रोळी : उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या अल्पवयीन मुलीचा रुग्णालयातीलच वॉर्डबॉयने विनयभंग केल्याची घटना आज विक्रोळी येथे घडली. मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी वॉर्डबॉयला अटक केली आहे.
विक्रोळीच्या टागोर नगर येथे राहणाऱ्या या १४ वर्षीय पीडित मुलीला अनेक दिवसांपासून ताप येत असल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिला याच परिसरातील मोदी रुग्णालयात दाखल केले. त्यानुसार या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातील वॉर्डबॉय अजिंक्य गमरे (२१) याने या मुलीसोबत अश्लील वर्तन केले. त्यामुळे आज मला घरी जायचे आहे. असा हट्ट या मुलीने कुटुंबीयांकडे केला. तिच्या कुटुंबीयांना संशय आल्याने त्यांनी तिला विश्वासात घेऊन तिची चौकशी केली. त्यानुसार तिने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी तत्काळ ही बाब रुग्णालय प्रशासनाच्या कानावर घालत विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आज सकाळी त्याला अटक केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Murdered of Wardoboy by a minor girl