साकीनाक्यात तरुणाची हत्या
By Admin | Updated: November 3, 2015 01:27 IST2015-11-03T01:27:55+5:302015-11-03T01:27:55+5:30
पत्ते खेळण्यावरून झालेल्या वादात सात जणांनी एका ३२ वर्षीय तरुणाची तलवारीने वार करून हत्या केल्याची घटना साकीनाका येथे घडली. याबाबत साकीनाका पोलिसांनी हत्येचा

साकीनाक्यात तरुणाची हत्या
मुंबई : पत्ते खेळण्यावरून झालेल्या वादात सात जणांनी एका ३२ वर्षीय तरुणाची तलवारीने वार करून हत्या केल्याची घटना साकीनाका येथे घडली. याबाबत साकीनाका पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे. भीमा पवार (३२) असे या मृत इसमाचे नाव असून तो साकीनाका येथील साकीविहार रोड परिसरात राहत होता.
वर्षभरापूर्वी त्याचा याच परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांसोबत पत्ते खेळण्यावरून वाद झाला होता. भीमादेखील गुन्हेगारी प्रवृत्तीचाच असल्याने त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. त्यामुळे आरोपी आणि त्याच्यात अनेकदा हाणामारी झाली होती. रविवारी सायंकाळी भीमा त्याच्या काही साथीदारांसह परिसरातून जात असताना आरोपी आणि त्यांच्याच बाचाबाची झाली. या वेळी आरोपींनी त्याच्या डोळ्यात मिरचीपूड घालत तलवारीने त्याच्यावर वार केले. तसेच त्याच्या दोन साथीदारांवर वार करत पळ काढला. रहिवाशांनी तत्काळ तिघांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच भीमाचा मृत्यू झाला. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी सहा आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे. (प्रतिनिधी)