क्षुल्लक वादातून तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:06 IST2021-07-19T04:06:18+5:302021-07-19T04:06:18+5:30

दोघांना अटक क्षुल्लक वादातून तरुणाची हत्या दोघांना अटक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पानटपरीवर झालेल्या क्षुल्लक वादातून लोअर परळमध्ये ...

Murder of a young man over a trivial dispute | क्षुल्लक वादातून तरुणाची हत्या

क्षुल्लक वादातून तरुणाची हत्या

दोघांना अटक

क्षुल्लक वादातून तरुणाची हत्या

दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पानटपरीवर झालेल्या क्षुल्लक वादातून लोअर परळमध्ये २० वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. प्रतीक उर्फ गुड्डू मयेकर या तरुणाची हत्या झाली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मुकेश पटानी (२७) आणि संतोष हरीजन (२५) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास येथील सेनापती बापट मार्गावर एम्पायर हाऊसजवळ ही घटना घडली. पटानी आणि हरीजन यांच्यासोबत प्रतीकचा किरकोळ कारणांवरून वाद झाला होता. तो सेनापती बापट मार्गावरून एकटा जात असल्याचे या दोन्ही आरोपींना दिसले. दोन्ही आरोपींनी त्याला अडकवून जबर मारहाण केली. त्यानंतर या दोघांनी प्रतीकच्या छातीमध्ये चाकू भोसकून तेथून पळ काढला. घटनेची वर्दी मिळताच ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी प्रतीकला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. प्रतीकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद विचारे यांनी सरकारतर्फे फिर्याद नोंदवत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पथकाने दोघांना अटक केली. यात पटानी हा प्रभादेवी, तर हरीजन हा शास्त्रीनगर (वांद्रे) येथे राहण्यास आहे.

Web Title: Murder of a young man over a trivial dispute