चारित्र्याच्या संशयावरून महिलेची हत्या, पतीवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: December 23, 2014 22:47 IST2014-12-23T22:47:01+5:302014-12-23T22:47:01+5:30
चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याची घटना टाकव्हाल मस्तान नाका येथे सोमवारी घडली

चारित्र्याच्या संशयावरून महिलेची हत्या, पतीवर गुन्हा दाखल
मनोर : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याची घटना टाकव्हाल मस्तान नाका येथे सोमवारी घडली. ही महिला ८० टक्के भाजली असून तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मनोर पोलीस ठाण्यात पतीविरूद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहा. पो. नि. आर. आर. पाटील करीत आहेत.
टाकव्हाल मस्तान नाका येथील हिफाजत शराफत खान हा चारित्र्याचा संशय घेऊन पत्नी उमा प्रविण हिला नेहमी शिवीगाळ करुन मारहाण करीत होता. १७ डिसेंबरला त्याने तिला मारहाण करून व अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिली. तिचे हात-पाय, पोटा गंभीर भाजल्याने ठाणे येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
उपचारादरम्यान, उमा प्रविण यांचे निधन झाले. मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास सुरू आहे. (वार्ताहर)