नालासोपाऱ्यात भांडणातून तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:24 IST2017-07-18T00:24:22+5:302017-07-18T00:24:22+5:30

डीजेच्या तालावर नाचत असताना, अश्लील नृत्य करीत असल्याने झालेल्या भांडणात, एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना रविवारी रात्री साडेअकराच्या

The murder of a teenager in a riot | नालासोपाऱ्यात भांडणातून तरुणाची हत्या

नालासोपाऱ्यात भांडणातून तरुणाची हत्या

- लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : डीजेच्या तालावर नाचत असताना, अश्लील नृत्य करीत असल्याने झालेल्या भांडणात, एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास नालासोपारा येथे घडली.
विनय डिचवलकर (२१) असे मृत तरुणाचे नाव आहे. नालासोपाऱ्यातील मोरेगावात रविवारी रात्री एका कार्यक्रमात काही तरुण बेधुंद नाचत होते. त्या वेळी अश्लील नृत्य करीत असल्याने, दोन गटांत हाणामारी झाली. योगेश सविनकर आणि मनोज सुर्वे यांच्यात हा वाद झाला. काहींनी मध्यस्थी करून दोघांचे भांडण मिटविले होते.
मात्र, रात्री साडेअकरा वाजता योगेश सविनकर मित्र नरेंद्र शर्मा आणि सात-आठ साथीदारांसह पुन्हा घटनास्थळी आला. त्यानंतर, या टोळक्याने मनोजला पुन्हा मारायला सुरुवात केली. या वेळी विनय डिचवलकर मारामारी सोडविण्यासाठी मध्यस्थी करू लागला. त्यामुळे संतापलेल्या योगेशने विनयला पाठीमागून पकडून ठेवले. त्यानंतर, नरेंद्रला चाकूने वार करण्यास सांगितले. त्याबरोबर नरेंद्रने विनयच्या छातीवर चाकूने सपासप वार केले. यात विनय गंभीर जखमी होऊन मरण पावला. यात पाच जण जखमी झाले असून, त्यातील दोघांची प्रकृत्ती चिंताजनक आहे. या प्रकरणी तुळींज पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत एकाही आरोपीला अटक झाली नव्हती.

Web Title: The murder of a teenager in a riot