खोड्यांना कंटाळून आईनेच केली मुलाची हत्या

By Admin | Updated: January 23, 2016 03:19 IST2016-01-23T03:19:04+5:302016-01-23T03:19:04+5:30

मुलाच्या वाढत्या खोड्यांना आणि त्याच्याविषयीच्या तक्रारींना कंटाळून जन्मदात्या आईने पोटच्या मुलाची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

The murder of a son by the mother | खोड्यांना कंटाळून आईनेच केली मुलाची हत्या

खोड्यांना कंटाळून आईनेच केली मुलाची हत्या

मुंबई : मुलाच्या वाढत्या खोड्यांना आणि त्याच्याविषयीच्या तक्रारींना कंटाळून जन्मदात्या आईने पोटच्या मुलाची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. खेरवाडी येथील या प्रकाराचा छडा तब्बल दोन वर्षांनी लागला आहे. आई नेहा चौगुलेला (३५) अटक करण्यात आली आहे. तिच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीत चौगुले कुटुंब राहते. गजानन मंत्रालयात लिपिक पदावर कार्यरत आहेत. पत्नी नेहा, मुलगी ऐश्वर्या आणि ९ वर्षांचा मुलगा अमेय असे हे चौकोनी कुटुंब. ३० मार्च २०१३ रोजी अमेयला अचानक उलट्या झाल्या. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची नोंद करत पोलिसांनी अधिक तपास सुरू केला होता. वर्षभरानंतर आलेल्या फॉरेन्सिक अहवालामध्ये अमेयचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे समोर आले. त्यानंतर खेरवाडी पोलिसांनी पुन्हा तपास सुरू केला.
अखेर दोन वर्षांच्या तपासानंतर या गुन्ह्याची उकल झाली आहे. नेहाने गुरुवारी गुन्ह्याची कबुली दिली. अमेयचा वाढत चाललेला वात्रटपणा, शाळा आणि वसाहतीतील मुलांना त्रास देत असल्याच्या तक्रारी यामुळे कंटाळून नेहानेच अमेयला विष दिले. त्यानंतर अमेयची गळा आवळून हत्या केली. (प्रतिनिधी)

Web Title: The murder of a son by the mother