मुंबई : घरासमोरील अंगण झाडताना मुलाच्या अंगावर घाण उडविल्याचे निमित्त करून, भावानेच आपल्या सख्ख्या मोठ्या भावाच्या डोक्यात पाइप घालून त्याची हत्या केल्याची घटना भांडुप स्टेशन रोडवर मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी गणेश रावजी पालकर (वय ४५) याला पोलिसांनी अटक केली. सुनील पालकर (५२) असे मारहाणीत ठार झालेल्या भावाचे नाव आहे.स्टेशन रोडवरील न्यू लकडावाला इमारतीत राहणाऱ्या पालकर बंधुंमध्ये वाद होता. त्यांच्यात नेहमी भांडण होत असे. मंगळवारी सुनील घरासमोर झाडलोट करीत असताना, घाण गणेशच्या मुलाच्या अंगावर उडाली. त्यामुळे त्यांच्यात वाद झाल. त्या वेळी गणेशने पी.व्ही.सी. पाइपच्या तुकड्याने त्यांना जबर मारहाण केली. यात डोक्यावर गंभीर वार झाल्याने सुनील यांचा मृत्यू झाला.
घाण उडविल्याने सख्ख्या भावाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 02:07 IST