सख्ख्या भावाची बॅटने हत्या
By Admin | Updated: July 3, 2017 07:01 IST2017-07-03T07:01:55+5:302017-07-03T07:01:55+5:30
घर खर्चासाठी पैसे देत असताना, ते घेतल्याच्या रागातून सख्ख्या लहान भावाची डोक्यात क्रिकेटची बॅट घालून हत्या करण्याची घटना

सख्ख्या भावाची बॅटने हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घर खर्चासाठी पैसे देत असताना, ते घेतल्याच्या रागातून सख्ख्या लहान भावाची डोक्यात क्रिकेटची बॅट घालून हत्या करण्याची घटना, शनिवारी रात्री नायगावातील बीडीडी चाळीत घडली. कालिदास उर्फ अजय प्रवीण मकवाना (वय ३५) असे त्याचे नाव असून, त्याने आपला भाऊ मुकेश (२७)ची अमानुषपणे हत्या केली.
नायगावातील न्यू बीडीडी चाळीतील पाच क्रमांकाच्या चाळीतील २० नंबरच्या खोलीमध्ये मधुबाई मकवाना या दोन मुले व सुनांसह राहतात. शनिवारी रात्री कालिदास हा मुकेश याच्याकडे घरखर्चासाठी पैसे देत असताना त्यांच्यात वाद झाला.
त्या वेळी कालिदासने संतापून त्याच्या डोके व खांद्यावर बॅटने वार केले. तो रक्तबंबाळ अवस्थेत पडला असता, शेजाऱ्यांनी त्याला रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. रात्री उशिरा कालिदासला अटक करण्यात आली़