कामावरून काढल्याच्या रागात सुरक्षा रक्षकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:28 IST2021-02-05T04:28:19+5:302021-02-05T04:28:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कामावरुन काढल्याच्या रागात झालेल्या वादातून सुरक्षा रक्षकाची हत्या केल्याची घटना वरळीत शनिवारी रात्री पावणेएकच्या ...

कामावरून काढल्याच्या रागात सुरक्षा रक्षकाची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कामावरुन काढल्याच्या रागात झालेल्या वादातून सुरक्षा रक्षकाची हत्या केल्याची घटना वरळीत शनिवारी रात्री पावणेएकच्या सुमारास घडली. याप्रकरणी वरळी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दयाशंकर जैसवार (५०) असे मृत सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.
वरळी येथील ए. के अहिरे मार्गावर असलेल्या एका बांधकाम साईटवर कामावरुन काढल्याच्या रागात अटक करण्यात आलेल्या आरोपीने वाद घातला. पुढे याच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात सुरक्षा रक्षक जैसवार यांच्या डोक्यात हातोड्याने हल्ला करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. दयाशंकर यांचा भाऊ रमाशंकर (६१) यांच्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करत एकाला अटक केली आहे.