अनैतिक संबंधातून विवाहितेची हत्या, आरोपीला वाराणसीतून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 02:37 IST2018-06-27T02:37:53+5:302018-06-27T02:37:56+5:30

अनैतिक संबंधातून गोरेगावमधील गुडिया निषाद (३१) या महिलेची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

The murder of a married man in connection with immoral relations, the accused arrested from Varanasi | अनैतिक संबंधातून विवाहितेची हत्या, आरोपीला वाराणसीतून अटक

अनैतिक संबंधातून विवाहितेची हत्या, आरोपीला वाराणसीतून अटक

मुंबई : अनैतिक संबंधातून गोरेगावमधील गुडिया निषाद (३१) या महिलेची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी तिच्या शेजारी राहणाऱ्या बहादूर उर्फ तेज बहादूर बिंड (२७) याला गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ने वाराणसीतून अटक केली.
गोरेगाव पश्चिमेकडील झोपडपट्टीमध्ये गुडिया ही पतीसोबत राहायची. तिचे बिंडसोबत अनैतिक संबंध होते. मात्र, बिंडचे त्याच परिसरातील अन्य दोन महिलांसोबतही अनैतिक संबंध असल्याचे तिला समजले. त्यावरून दोघांमध्ये खटके उडत असत. शनिवारी गुडिया त्या दोन महिलांपैकी एकीच्या घरी गेली. तेव्हा बिंड त्या महिलेच्या घरी तिला दिसला. त्यामुळे बिंडसोबत तिचे कडाक्याचे भांडण झाले. याच रागात बिंड गुडियाच्या घरी आला. मात्र, तेव्हा तिने त्याला मारहाण सुरू केली. त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रागाने त्याने गुडियाचा गळा चिरून घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला. गुन्हे शाखेच्या कक्ष ११चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने समांतर तपास सुरू केला.
ते बिंडच्या मागावर होते. मात्र, तो सतत त्याची जागा बदलत होता. अखेर वाराणसी विमानतळ परिसरातून त्याला बेड्या ठोकण्यात पथकाला यश आले. त्याला गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Web Title: The murder of a married man in connection with immoral relations, the accused arrested from Varanasi