नागपाडय़ात चोरटय़ांनी केली एकाकी वृद्धाची हत्या

By Admin | Updated: June 29, 2014 01:55 IST2014-06-29T01:55:17+5:302014-06-29T01:55:17+5:30

मदनपु:यात एकाकी राहणा:या 96 वर्षाच्या वयोवृद्धाची हत्या करून चोरटय़ांनी चोरीचा प्रय} केला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली.

The murder of a lonely grandson by the thieves in Nagpada | नागपाडय़ात चोरटय़ांनी केली एकाकी वृद्धाची हत्या

नागपाडय़ात चोरटय़ांनी केली एकाकी वृद्धाची हत्या

>मुंबई : मदनपु:यात एकाकी राहणा:या 96 वर्षाच्या वयोवृद्धाची हत्या करून चोरटय़ांनी चोरीचा प्रय} केला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. परिचितांपैकीच कोणीतरी हा गुन्हा केल्याचा संशय पोलिसांना आहे.
हमीद जान महोम्मद अन्सारी असे मृत वृद्धाचे नाव असून, ते मदनपु:यातील दुसरी घेलाभाई स्ट्रीट येथील घरी एकटेच राहत होते. पोस्टातून निवृत्त झालेले हमीद यांची मुले आसपासच मात्र स्वतंत्रपणो राहतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वय झाले तरी हमीद शरीर व मनाने कणखर होते. सकाळी त्यांचा पणतू घरी आला तेव्हा हमीद मृतावस्थेत आढळले. त्यांचे हात मागे बांधलेले होते. पलंगावर त्यांना बांधून ठेवलेले होते. त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबण्यात आला होता. हे चित्र पाहून भेदरलेल्या पणतूने आपल्या कुटुंबीयांना ही बाब कळवली. तसेच शेजा:यांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात नेले. मात्र हमीद यांचा त्याआधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. नागपाडा पोलिसांनी हमीद यांचे घर तपासले तेव्हा कपाटावर व्रण आढळले. अज्ञात मारेक:यांनी कपाट फोडण्याचा प्रय} केला होता. मात्र त्यात ते अयशस्वी ठरले. अखेर चोरटय़ांनी हमीद यांच्या घरात पडलेले जुने पाच मोबाइल चोरून पळ काढला. हमीद यांची हत्या ओळखीतल्याच व्यक्तींनी केली असावी. चोरटय़ांनी जे कपाट फोडण्याचा प्रय} केला त्यात हमीद यांची साडेसहा लाखांची रोकड होती, मात्र कपाट फोडता न आल्याने हा ऐवज सुरक्षित राहिला, असे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The murder of a lonely grandson by the thieves in Nagpada