लग्नास नकार देणाऱ्या प्रेयसीची हत्या
By Admin | Updated: June 5, 2015 01:33 IST2015-06-05T01:33:17+5:302015-06-05T01:33:17+5:30
अल्पवयीन मुलीने लग्नास नकार दिल्याने जंगलात नेऊन प्रियकराने तिची निर्घूण हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी कर्जत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे

लग्नास नकार देणाऱ्या प्रेयसीची हत्या
कर्जत : अल्पवयीन मुलीने लग्नास नकार दिल्याने जंगलात नेऊन प्रियकराने तिची निर्घूण हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी कर्जत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे
तालुक्यातील भिवपुरी आदिवासी वाडीतील उज्वला वाघमारे (१५) हिचे याच परिसरातील सुरज लहू मुकणे ( १९ ) याच्याशी प्रेम होते. गतवर्षी नवरात्रौत्सवात दोघे पळून गेले होते. त्यावेळी उज्वलाच्या कुटुंबीयांनी तिला समजावून घरी परत आणले होते. दरम्यानच्या काळात उज्वालाने सुरजला नकार दिला. त्यामुळे सुरज आणि त्याचा अविनाश किसन मुकणे यांनी उज्वलाचा काटा काढण्याचे ठरविले.
सुरजने बोलायचे आहे, असे सांगून उज्ज्वलाला बुधवारी रात्री घराबाहेर बोलावले. उज्वला घरातील कुणालाही न सांगता गुपचूप घराबाहेर पडली. सूरज तिला घेऊन जंगलाच्या दिशेने गेला. जंगलातील प्राचीन तळ्याजवळ उज्ज्वलाची सूरज आणि अविनाशबरोबर वादावादी झाली. त्यावेळी संतापलेल्या सुरजने तिच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. उज्वलाचे वडील महादू वाघमारे यांनी यप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर संशयित सुरज व अविनाशला अटक करण्यात आली.