मुलुंडमध्ये तरुणीची हत्या

By Admin | Updated: September 16, 2014 02:57 IST2014-09-16T02:57:00+5:302014-09-16T02:57:00+5:30

कचराकुंडीतील एका प्लॅस्टिक गोणीमध्ये 25 ते 3क् वयोगटातील तरुणीचा मृतदेह आढळल्याने मुलुंड परिसरात खळबळ उडाली आहे.

The murder of the girl in Mulund | मुलुंडमध्ये तरुणीची हत्या

मुलुंडमध्ये तरुणीची हत्या

मुंबई : कचराकुंडीतील एका प्लॅस्टिक गोणीमध्ये  25 ते 3क् वयोगटातील तरुणीचा मृतदेह आढळल्याने मुलुंड परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणीची ओळख अद्यापि पटलेली नसून या प्रकरणी मुलुंड नवघर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
मुलुंड पूर्वेकडील डम्पिंग यार्ड परिसरातून रविवारी सायंकाळी 7च्या सुमारास कचरा नेण्यासाठी आलेल्या पालिका कर्मचा:याला कचराकुंडीत प्लॅस्टिकची गोणी आढळली. गोणीच्या संशयास्पद आकारामुळे कर्मचा:यांनी तत्काळ पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत गोणी उघडली असता, त्यात  तरुणीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या अंगावर जखमा आढळून आलेल्या आहेत. तरुणीला सावरकर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र  डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित केले. तरुणीला मारहाण, तसेच हत्याराचा वापर करून अथवा गळा आवळून तिची हत्या करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. शवविच्छेदनासाठी तरुणीचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
या प्रकरणी मुलुंड नवघर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणोश गायकवाड यांनी दिली. (प्रतिनिधी)

 

Web Title: The murder of the girl in Mulund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.