मुंबई : अंधेरीत आसमा निसार शेख (२५) या तरुणीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी तिचा माजी प्रियकर जमीर उर्फ अल्लरखा सलीम खान (३०) याला कर्नाटक राज्यातून डीएननगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केलीे. प्रेम संबंधाला नकार दिल्याच्या रागात ही हत्या करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.कर्नाटकच्या यादगीर जिल्ह्यातील गॅरेजमध्ये तो लपला होता. त्याला तिथून डीएननगर पोलिसांच्या पथकाने अटक केली. शेखसोबत अल्लारखाचे प्रेमसंबंध होते. त्यांचे ब्रेकअप झाले होते. अल्लरखाला पुन्हा तिच्याशी संबंध प्रस्थापित करायचे होते. शेख त्याला नकार देत होती. तिने त्याचे आठ हजार रुपये चोरल्याचा संशय त्याला होता. यामुळे तो रागात होता. याच रागातून त्याने तिचा काटा काढल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.शेखच्या डोक्यात दगड घालून तिला ठार मारण्यात आले होते. मारेकऱ्याला शोधण्यासाठी ५ पथके तयार केली होती, असे डीएननगर पोलीस ठाण्याचे प्रमुख परमेश्वर गणमे यांनी सांगितले.
तरुणीची हत्या; माजी प्रियकराला कर्नाटकात बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 04:50 IST