Join us

धक्कादायक! 'ल्युडो' खेळात जिंकला म्हणून मित्राची हत्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 07:01 IST

अमित राज असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. मयत ए. नलावडे हा त्याचा मित्र असून एकत्र थट्टा मस्करी करत 'ल्युडो' हा खेळ खेळायचे. ज्यात नलावडे हा नेहमी हरायचा.

मुंबई : मित्रासोबत ल्युडो खेळात नेहमी हरणारा तरुण पहिल्यांदा त्यात जिंकला. या रागात त्याच्या मित्राने त्याला बेदम मारहाण केली. ज्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मालाड पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली आहे.अमित राज असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. मयत ए. नलावडे हा त्याचा मित्र असून एकत्र थट्टा मस्करी करत 'ल्युडो' हा खेळ खेळायचे. ज्यात नलावडे हा नेहमी हरायचा. मात्र मार्च महिन्यात तो अचानक खेळात जिंकू लागला. ही बाब अमितला खटकू लागली. तेव्हा त्यांच्यात वाद झाले आणि प्रकार हाणामारीवर जाऊन पोहोचला. नलावडे याला अमितने बेदम मारहाण केली आणि त्या अवस्थेत तो घरी निघाला. मात्र रस्त्यात अचानक कोसळला व त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरने त्याला तपासले आणि मयत घोषित केले. मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय लिगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'नलावडेच्या कुटुंबीयांनी कोरोनाच्या भीतीने शवविच्छेदन न करताच त्याचे अंत्यसंस्कार केले. मात्र काही दिवसानंतर त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांकडून नलावडेचा खून झाल्याचे त्यांना समजले. त्यानुसार त्यांनी २० मार्च, २०२१ रोजी मालाड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला.