चारित्र्याच्या संशयावरून धारावीत प}ीची हत्या
By Admin | Updated: September 19, 2014 03:01 IST2014-09-19T03:01:25+5:302014-09-19T03:01:25+5:30
मुलुंड पूर्व येथील डम्पिंग ग्राऊंडवर गोणीत सापडलेल्या तरुणीच्या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे.

चारित्र्याच्या संशयावरून धारावीत प}ीची हत्या
मुंबई : मुलुंड पूर्व येथील डम्पिंग ग्राऊंडवर गोणीत सापडलेल्या तरुणीच्या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. राखादेवी संजयकुमार रघुप्रसाद गौतम (26) असे मृत तरुणीचे नाव असून पतीच्या संशयी वृत्तीची ती बळी ठरल्याचे समोर आले. पती संजयकुमारला गुन्हे शाखेने गजाआड केले आहे.
मूळची उत्तर प्रदेश येथे राहणारी राखादेवी लगAानंतर दीड महिन्यांपूर्वीच पती संजयसोबत धारावी, राजीव गांधी नगर येथील विश्वकर्मा चाळीमध्ये राहण्यास आली होती. मात्र 14 सप्टेंबर रोजी या महिलेचा मृतदेह मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर एका प्लास्टीक पिशवीमध्ये आढळून आला होता. नवघर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविला.
दरम्यान, समांतर तपास करणा:या गुन्हे शाखेच्या घाटकोपर युनिटला ही गोणी धारावी परिसरातून कच:याच्या गाडीसोबत डंम्पिंग ग्राऊंडवर आल्याची पक्की खबर मिळाली. पुढे युनिटचे एपीआय अनिल ढोले यांना त्यांच्या खब:यांमार्फत संजयची प}ी राखादेवी बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. उलटतपासणीत त्याने दिलेली सर्व बातमी खोटी ठरली. अखेर त्याने आधी राखादेवीला बेदम मारहाण केल्याचे, नंतर विषारी द्रव्य पाजून तिची हत्या केल्याची कबुली दिली. (प्रतिनिधी)
लोकल ट्रेनमधून राखादेवी हरविल्याची बोंब संजयने परिसरात ठोकली होती. संशयावरून ढोले आणि पथकाने संजयला ताब्यात घेतले. त्याने जीवदानीला जाताना राखादेवी हरवली, असे सांगितले. मात्र त्याबद्दल पोलीस तक्रार का केली नाहीस, या प्रश्नाचे उत्तर देताना त्याची बोबडी वळली.