मृत बापावर मुलींच्या हत्येचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:05 IST2020-12-06T04:05:49+5:302020-12-06T04:05:49+5:30

शवविच्छेदन अहवालानंतर कांदिवली पोलिसांची कारवाई : मुलींची हत्या करून वडिलांचे आत्महत्या प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दोन मुलींची ...

Murder of daughters on dead father | मृत बापावर मुलींच्या हत्येचा गुन्हा

मृत बापावर मुलींच्या हत्येचा गुन्हा

शवविच्छेदन अहवालानंतर कांदिवली पोलिसांची कारवाई : मुलींची हत्या करून वडिलांचे आत्महत्या प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दोन मुलींची हत्या करून त्यांचे वडील अजगर अली जब्बार अली ऊर्फ बबली (४५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले. त्यानुसार अली यांच्यावर शुक्रवारी उशिरा रात्री हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अली यांच्यासह त्यांच्या दोन मुली कनेन (१३) आणि सुझेन (८) यांचे मृतदेह कांदिवलीतील त्यांच्या कारखान्यात गुरुवारी आढळले होते. अली यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाईड नोटही पोलिसांना सापडली हाेती. तरीही दोघींच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा पोलीस करत होते. अहवाल शुक्रवारी उशिरा मिळाल्यानंतर पोलिसांनी अलीवर दोन्ही मुलींच्या हत्येचा आरोप ठेवत गुन्हा दाखल केला. गळा दाबल्याने तसेच श्वास घुसमटून दोघींचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

आर्थिक चणचण तसेच किडनीच्या आजारामुळे कंटाळल्यामुळे आलेल्या निराशेतून अली यांनी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले हाेते. गुरुवारी संध्याकाळी कांदिवलीत हा प्रकार उघडकीस आला हाेता.

.....................................

Web Title: Murder of daughters on dead father