बोरीवलीत गृहिणीची हत्या

By Admin | Updated: September 6, 2014 02:50 IST2014-09-06T02:50:32+5:302014-09-06T02:50:32+5:30

बोरीवलीच्या बाभईनाक्याजवळील कृष्णा क्लासिक टॉवरमध्ये राहणा:या सीमा जयप्रकाश पाताडे (47) यांची काल हत्या करण्यात आली.

The murder of Borivali homemaker | बोरीवलीत गृहिणीची हत्या

बोरीवलीत गृहिणीची हत्या

मुंबई : बोरीवलीच्या बाभईनाक्याजवळील कृष्णा क्लासिक टॉवरमध्ये राहणा:या सीमा जयप्रकाश पाताडे (47) यांची काल हत्या करण्यात आली. हत्या घडली तेव्हा त्या घरी एकटय़ाच होत्या. हत्येनंतर हल्लेखोराने सीमा यांचे काही दागिने हिसकावल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. 
हत्येचा गुन्हा नोंदवून तपास करणा:या बोरीवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा यांचे पती जयप्रकाश गणोशोत्सवानिमित्त 24 ऑगस्टला गावी गेले होते, तर मुलगी सकाळी कॉलेजसाठी घराबाहेर पडली होती. मुलगी संध्याकाळी पाचच्या सुमारास घरी परतली. घर आतून बंद होते. सीमा यांना जाग नसल्याने मुलीने दुस:या चावीने दरवाजा उघडून आत प्रवेश केला, तेव्हा सीमा पलंगावर मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या डोक्याला मागच्या बाजूस खोलवर जखम आढळली. प्राथमिक पाहणीत हल्ल्यानंतर हल्लेखोराने तोंडावर उशी ठेवून सीमा यांची हत्या केली असावी.
पंचनाम्यादरम्यान सीमा यांच्या कानातले गायब झाल्याचे आढळले. आश्चर्य म्हणजे हल्लेखोराने चोरी करण्यासाठी घरातल्या अन्य वस्तूंची शोधाशोध केल्याचे पोलिसांना आढळले नाही. तसेच घरात शिरताना हल्लेखोराने जबरदस्ती केल्याचेही आढळलेले नाही. त्यामुळे हल्लेखोर सीमा यांच्या परिचयातील असावा, असा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, सीमा आणि जयप्रकाश या दोघांचाही हा दुसरा विवाह. निवृत्त अकाउंटन्ट असलेल्या जयप्रकाश यांची पहिली पत्नी आणि सीमा यांच्यात वाद होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. 
प्राथमिक तपासातून चोरी हा उद्देश पुढे येतोय; मात्र कौटुंबिक वादाच्या दृष्टिकोनातूनही तपास करू, अशी प्रतिक्रिया बोरीवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नारायण खैरे यांनी व्यक्त केली. पोलिसांनी सोसायटीतल्या सीसीटीव्हींनी कैद केलेले चित्रण ताब्यात घेऊन चाचपणी सुरू केली आहे. यातून सोसायटीत आलेल्यांची माहिती मिळणार आहे. याशिवाय पोलिसांनी सोसायटीच्या सुरक्षारक्षक आणि सीमा यांच्या शेजारी राहणा:यांकडे चौकशी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)  
 
च्सीमा आणि जयप्रकाश या दोघांचाही हा दुसरा विवाह. निवृत्त अकाउंटन्ट असलेल्या जयप्रकाश यांची पहिली पत्नी आणि सीमा यांच्यात वाद होता. प्राथमिक तपासातून चोरी हा उद्देश पुढे येतोय; मात्र कौटुंबिक वादाच्या दृष्टिकोनातूनही तपास करू, असे पोलिसांनी सांगितले. 

 

Web Title: The murder of Borivali homemaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.