पूर्ववैमनस्यातून गोवडीत तरुणावर खुनीहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:06 IST2021-07-11T04:06:39+5:302021-07-11T04:06:39+5:30

मुंबई : पूर्वीचा वाद मिटविण्यासाठी चर्चा करीत असताना एका तरुणाला लाकडी बांबूने मारहाण करून त्याच्या डोक्यावर खंजीरने वार करण्याची ...

Murder attack on a young man in Gowdi out of prejudice | पूर्ववैमनस्यातून गोवडीत तरुणावर खुनीहल्ला

पूर्ववैमनस्यातून गोवडीत तरुणावर खुनीहल्ला

मुंबई : पूर्वीचा वाद मिटविण्यासाठी चर्चा करीत असताना एका तरुणाला लाकडी बांबूने मारहाण करून त्याच्या डोक्यावर खंजीरने वार करण्याची घटना शुक्रवारी गोवंडी परिसरात घडली. सलाउद्दीन नूर मोहम्मद सईद (वय २१, रा. गोवंडी) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याची प्रकृती अत्यवस्थ आहे. याप्रकरणी लालू, रेश्मा व अन्य दोन अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले.

सलाउद्दीन सईद हा त्याचा मित्र इम्रान याच्यासमवेत शुक्रवारी दुपारी लालू नावाच्या तरुणाबरोबर पूर्वी असलेला वाद मिटविण्यासाठी शकील नावाच्या मित्राच्या घरी गेला होता. त्यावेळी लालू, रेश्मा व दोन अनोळखी हाताने व बांबूने मित्र इमरान याला मारले व सलाउद्दीनला लालूने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने खंजिरने डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली. तो रक्तबंबाळ झाल्यावर इतरांनी पळ काढला. सईद याच्यावर उपचार सुरू असून चौघांविरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Murder attack on a young man in Gowdi out of prejudice