विनयभंग करणाऱ्या प्राध्यापकास अटक

By Admin | Updated: February 11, 2015 22:35 IST2015-02-11T22:35:29+5:302015-02-11T22:35:29+5:30

मुरुड येथील अंजुमन इस्लाम शाळेतील ११ वी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करुन विनयभंग करणारा प्राध्यापक दैयान युसूफ सय्यद फरार झाला होता

Munked professor arrested | विनयभंग करणाऱ्या प्राध्यापकास अटक

विनयभंग करणाऱ्या प्राध्यापकास अटक

आगरदांडा : मुरुड येथील अंजुमन इस्लाम शाळेतील ११ वी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करुन विनयभंग करणारा प्राध्यापक दैयान युसूफ सय्यद फरार झाला होता. त्याच्याविरोधात मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. त्याला कायदेशीर नोटीस दिल्यानंतर, पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्याला पोलीस उपनिरीक्षक राजवर्धन खेबुर्डे यांनी अटक केली.
मुरुड पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, अंजुमन इस्लाम जंजिरा कनिष्ठ महाविद्यालय मुरुड येथे इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत शिकणारी किशोरवयीन विद्यार्थिनी २३ सप्टेंबर २०१४ रोजी भौतिकशास्त्र विषयाच्या शिकवणीसाठी प्राध्यापक दैयान युसूफ सय्यद यांच्या घरी गेली होती. त्यावेळी या विषयाची माहिती देताना प्राध्यापक अचानक तिच्याशी अश्लील वर्तन करू लागला. त्यावेळी घाबरून तिने आई-वडिलांच्या कानावर ही गोष्ट टाकल्यावर त्याच्यावर मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आज अखेर पोलिसांनी त्याला गजाआड करून अलिबाग जिल्हा दिवाणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (वार्ताहर)

Web Title: Munked professor arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.