पालिका रुग्णालयातील एसी सहा तास बंद
By Admin | Updated: May 11, 2015 02:04 IST2015-05-11T02:04:58+5:302015-05-11T02:04:58+5:30
विक्रोळीतील महापालिकेच्या महात्मा फुले रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील एसी शुक्रवारी तब्बल सहा तास बंद होता.

पालिका रुग्णालयातील एसी सहा तास बंद
मुंबई : विक्रोळीतील महापालिकेच्या महात्मा फुले रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील एसी शुक्रवारी तब्बल सहा तास बंद होता. यामुळे रुग्णांना नाहक त्रास झाला. मुळात या विभागात प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना ठेवले जाते. त्यामुळे तेथे जंतू संसर्ग होऊ नये यासाठी या विभागात एसी असतो. मात्र शुक्रवारी या रुग्णालयातील एसी अचानक बंद पडल्याने रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवण्यात आले.
विक्रोळी कन्नमवार नगर २ येथे असणाऱ्या पालिकेच्या या पूर्व उपनगरातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. उन्हाळ्यात सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, उलट्या, जुलाब अशा आजाराने रुग्णांच्या संख्येत वाढ होते. या रुग्णालयातील तळमजल्यावर ओपीडी विभाग, बाल चिकित्सा विभाग, अस्थिभंग विभाग तर पहिल्या मजल्यावर महिला आणि पुरुष कक्ष तसेच सोनोग्राफी आणि अतिदक्षता विभाग आहेत.
यामध्येही गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात येते. एकीकडे महात्मा फुले रुग्णालय अपुऱ्या सोयीसुविधांअभावी बंद पडण्याच्या वाटेवर आहे. यात आणखीन भर म्हणून की काय शुक्रवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास अतिदक्षता विभागातील एसी बंद पडला. यावेळी एकूण ९ रुग्ण या विभागत उपचार घेत होते. एसीअभावी या रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. यापैकी दोन रुग्णांची प्रकति अधिकच गंभीर झाल्याने त्यांना तात्काळ दुसरीकडे हलविण्यात आले. एसीच्या प्रतिक्षेत तब्बल सहा तास ताटकळत रहावे लागले असल्याची माहीती मनोज भोसले या रुग्णाने लोकमतशी बोलताना दिली. रात्री साडे बाराच्या सुमारास एसीतील बिघाड दुरुस्त करुन तो पूर्ववत करण्यात आला. (प्रतिनिधी)
सायंकाळी साडे सातच्या सुमारास अतिदक्षता विभागातील एसी बंद पडला. या वेळी एकूण ९ रुग्ण या विभागत उपचार घेत होते. एसीअभावी या रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला.