अवैध बांधकामांवर महानगरपालिकेचा वॉच
By Admin | Updated: September 17, 2014 22:35 IST2014-09-17T22:35:09+5:302014-09-17T22:35:09+5:30
निवडणुकीच्या आड शहरात होणा:या अनधिकृत बांधकामांवर वॉच ठेवण्याचा निर्णय ठाणो महापालिकेने घेतला आहे.
अवैध बांधकामांवर महानगरपालिकेचा वॉच
ठाणो : निवडणुकीच्या आड शहरात होणा:या अनधिकृत बांधकामांवर वॉच ठेवण्याचा निर्णय ठाणो महापालिकेने घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारे अनधिकृत बांधकामे झाली होती. त्यामुळे तसा प्रकार पुन्हा
होऊ नये, यासाठी आता महापालिकेने कंबर कसली असून प्रत्येक प्रभाग समितीत एकेक पथक यासाठी तैनात केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात मुंब्रा, घोडबंदर, वागळे, रायलादेवी आणि शहराच्या इतर भागांत खासकरून झोपडपट्टी भागांत अनधिकृत बांधकामे झाली होती. परंतु, पालिकेचे कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त झाल्याने या बांधकामांवर कारवाई करता आली नव्हती. त्यानंतर, स्थायी समितीच्या बैठकीत यासंदर्भात सदस्यांनी आगपाखड केल्यानंतर पालिकेने शहरात निवडणूक काळात झालेल्या अनधिकृत बांधकामांचा सव्र्हे
करण्याचे काम हाती घेतले होते. हा सव्र्हे झाल्यावर कारवाईचा बडगादेखील उगारण्यास सुरुवात झाली होती. परंतु, आता
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने शहरात पुन्हा अनधिकृत बांधकामांना उधाण येण्याची चिन्हे आहेत.
परंतु, मुंब्य्रात झालेली इमारत दुर्घटना आणि त्यानंतर पावसाळ्यात होणा:या दुर्घटनांमुळे तशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत आणि नव्याने बांधकामे होऊ नयेत, यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. (प्रतिनिधी)
प्रभाग समितीनिहाय विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांद्वारे नव्याने होणा:या अनधिकृत बांधकामांवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यानुसार, याच काळात बांधकामांवर कारवाईसुद्धा केली जाईल, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
याचाच एक भाग म्हणून मंगळवारी कळव्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली आहे. तसेच बुधवारी शहरातील बारवरसुद्धा हातोडा पडला आहे. दरम्यान, पालिका कर्मचा:यांची टप्प्याटप्प्याने निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती होत असल्याने हे कर्मचारीही येत्या आठवडाभरात कमी होणार आहेत. पुढे कारवाई कशी सुरू ठेवायची, हा प्रश्नदेखील पालिकेला सतावत आहे.