डेंग्यूची माहिती देण्यात महापालिका असमर्थ

By Admin | Updated: October 29, 2014 00:59 IST2014-10-29T00:59:20+5:302014-10-29T00:59:20+5:30

अस्वच्छतेसाठी खासगी सोसायटय़ांना दोष देणा:या पालिकेच्या दिव्याखालीच अंधार असल्याचे केईएम रुग्णालय परिसरात दिसून आल़े

Municipal unable to provide information about dengue | डेंग्यूची माहिती देण्यात महापालिका असमर्थ

डेंग्यूची माहिती देण्यात महापालिका असमर्थ

मुंबई :  अस्वच्छतेसाठी खासगी सोसायटय़ांना दोष देणा:या पालिकेच्या दिव्याखालीच अंधार असल्याचे केईएम रुग्णालय परिसरात दिसून आल़े येथील निवासी डॉक्टर डेंग्यूची बळी ठरल्याचे तीव्र पडसाद सार्वजनिक आरोग्य समितीच्या बैठकीत आज उमटल़े मात्र मुंबईतील रुग्णांची आकडेवारी, प्रतिबंधक उपाययोजनांची सद्य:स्थितीची माहिती देण्यास आरोग्य खाते असमर्थ ठरल़े यामुळे संतप्त सदस्यांनी आरोग्य समितीची बैठक तहकूब केली़
शिवसेनेच्या डॉ़ अनुराधा पेडणोकर यांनी हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे सार्वजनिक आरोग्य समितीचे या गंभीर विषयाकडे लक्ष वेधल़े हा मुद्दा सर्वपक्षीय सदस्यांनी उचलून धरला़ पावसाळ्यानंतरही डेंग्यूचा फैलाव सुरू आह़े पालिकेचे आरोग्य खाते, कीटकनाशक विभाग काही काम करताना दिसत नाहीत, अशी तक्रार सदस्यांनी केली़ खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांचा आकडा मोठा आह़े मात्र खासगी रुग्णालय कधीही पालिकेला कळवत नाहीत, असा संताप सदस्यांनी व्यक्त केला़
नगरसेवकांनी कळविल्यानंतर कीटकनाशक विभाग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी वॉर्डात येतात़ मात्र त्यातही ठरावीक घरांर्पयतच धूरफवारणी करणार,  अशी आडमुठी भूमिका घेतली जाते, अशी तक्रारही काही सदस्यांनी केली़ शिवसेनेच्या डॉ़ भारती बावदाने, काँग्रेसच्या डॉ़ अंजता यादव, राष्ट्रवादीच्या डॉ़ सईदा शेख यांनी दावाखान्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढले असल्याचे सांगितल़े (प्रतिनिधी)
 
कीटकनाशक विभागाची तोडपाणी
एका बांधकाम व्यावसायिकाला धूरफवारणीचे साडेतीन लाख रुपयांचे बिल पाठविण्यात आल़े मात्र याची तक्रार करताच नजरचुकीमुळे एक शून्य वाढल्याचा अजब खुलासा प्रशासनाने केला आह़े व्यावसायिकांना मोठय़ा आकडय़ाचे बिल पाठवून त्यानंतर तोडपाणी केली जात असल्याचा आरोप अनुराधा पेडणोकर यांनी केला़

 

Web Title: Municipal unable to provide information about dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.